हैदराबाद; : अभिनेत्री दीपिका पुदुकोन हिला चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अचानक ह्रदयाचे ठोके वाढल्याचा त्रास होऊ लागला. यामुळे तिला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपिका पदुकोन सध्या हैदराबाद येथे एका चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. चित्रपटाच्या सेटवर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अभिनेत्री दीपिका सध्या हैदराबाद येथे तिचा आगामी चित्रपट ‘प्रोजक्ट के’ चे शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटात बीग बी अमिताभ बच्चन यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सेटवर दीपिकाला अस्वस्थ वाटू लागले तसेच तिला ह्रदयाचे ठोक वाढल्याचा त्रास जाणवू लागला. यावेळी सेटवरील सहकार्यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथील कामिनेनी रुग्णालयात दाखल केले.
दीपिका पुदुकोन ; चित्रिकरणादरम्यान ह्रदयाचे ठोके वाढल्याने दीपिका पदुकोन रुग्णालयात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -