ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली: जे करायचं ते रणांगणात ही आपली सवय आहे. शिवाय प्रत्यक्ष लढाईमध्ये आम्ही मैदानात कसं उतरतो हे सगळ्यांना माहीत आहे. अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक गटाला इशारा दिला. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात 5-6 वर्षात जनतेतील निवडणुकीतून जनतेचा कल स्पष्ट झाला आहे,असा टोला देखील महाडिक गटाला मंत्री सतेज पाटील यांनी लगावला. सांगलीत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी इशारा दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे धनंजय महाडिक विजय झाले. तुमच्या विजयानंतर कोल्हापूर शहरामध्ये महाडिक गटाकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. तसेच विजयोत्सवा बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण बदलणार असा दावा करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या स्टाईलने महाडिकांच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून सांगली बॅडिंग अंतर्गत शहरातील झुलेलाल चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड नामफलकाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज पार पडले.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत सत्तांतर होत असतात. कोल्हापूरकर (Kolhapur)म्हणून आम्ही तो स्वीकारतो. पण महाडिकांच्या विजयावर आपण जास्त भाष्य करणार नाही. मात्र गेल्या पाच-सहा वर्षातील जनतेच्या निवडणुकीतून जो कल आहे तो स्पष्ट झाला आहे. तसेच आपण जे काय करतो ते रणांगणात आल्यावरच करतो. आता कोणत्याही जिल्हा परिषद,महानगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका जवळपास नाहीत असेही ते म्हणाले. लढाई आले की आपण मैदानात कसे उतरतो हे सगळ्यांनाचं माहीत आहे अशा शब्दात महाडिक गटाला मंत्री पाटील यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला.