Monday, February 23, 2026
Homeराजकीय घडामोडी"आदित्य ठाकरेंचे लवकर शुभमंगल होवो आणि सुनबाई."; अयोध्या दौऱ्यावरुन भाजपा खासदाराच्या ठाकरे...

“आदित्य ठाकरेंचे लवकर शुभमंगल होवो आणि सुनबाई.”; अयोध्या दौऱ्यावरुन भाजपा खासदाराच्या ठाकरे कुटुंबाला शुभेच्छा

शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित होत असताना महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेचे अनेक नेते अयोध्येत पोहोचले होते.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत आधीच अयोध्येत हजर झाले होते. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम पूर्णपणे धार्मिक आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये. अयोध्येला गेल्याने ऊर्जा मिळते, असा शिवसेनेचा विश्वास आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यानंतर आता अयोध्या दौऱ्यावरुन भाजपाचे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे यांनी आदित्य ठाकरेंचे लवकर लग्न व्हावे असे म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना अनिल बोंडे यांनी याबाबत भाष्य केले आहे.

“प्रभू श्रीरामाचे ते दर्शन घेत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मी सिद्धीविनायकला जाऊन आलो त्यावेळी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली की आदित्य ठाकरेंचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. ते माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. विदर्भातील सून असेल तर फारच चांगले होईल,” असे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी सकाळी लखनऊला पोहोचले. त्यानंतर ते अयोध्येत गेले. आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात पूजा केली. त्यानंतर राम मंदिर आणि हनुमानगढीमध्ये दर्शन आणि पूजा करणार आहोत. लखनऊ विमानतळावर पोहोचल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -