शासनाने सिंगल युज प्लॅस्टिक वर पूर्णपणे बंदी घातली असून गडहिंग्लज शहरात पालिके मार्फत प्लॅस्टिक विरोधी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन देखील पालिका करत आहे. तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार नुसार मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तपासणी पथकाने बस स्थानक परिसरात पाहणी केली असता विविध सहा दुकानातून एकूण ६८ किलो प्लॅस्टिक बॅगा आढळुन आल्या त्या सर्व जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची दुकाने सील करण्यात आली.
आज पालिकेने थेट दुकाने सील करण्याची कडक कारवाई केल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शना खाली पथक प्रमुख रविनंदन जाधव, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे, अधीनस्त कर्मचारी महादेव बारामती, सागर येवारे, निखिल बारामती, बसवराज कांबळे, रामा लाखे, शामराव वडर, भारत घेज्जी, सौरभ लाखे, आकाश सोनटक्के, प्रल्हाद लाखे यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.