ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ६६ हजार ४६० रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून जाब विचारला. ते कारमधून खाली उतरताच भाऊ आपला पैशाचा विषय मिटवा म्हणत अडवले. यावेळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे यावेळी गोंधळ उडाला. यावेळी सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सारवासारव करीत असतील पैसे तर देऊन टाकू असे म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हॉटेल मालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले.
भाऊ माझ्या हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा
पंचायत राज्य समितीच्या सांगोला दौऱ्यात काल बुधवारी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांचे सांगोला पंचायत समितीच्या आवारात आगमन होताच ते कारमधून खाली उतरले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून अचानक मांजरी ता. सांगोला येथील हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी त्यांना आडवले. भाऊ माझे सन २०१४ मधील हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा असे म्हणून त्यांना रोखले. अचानक या प्रकारामुळे सर्वांचे लक्ष त्या दोघांच्या चर्चेकडे वळले.
यावेळी शिनगारे यांनी या बिलासाठी मी ८ वर्षे वाट पाहिली. मी सदा भाऊंना बिलासंदर्भात फोन केला असता त्यांनी मला लेका मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसलं बिल असे बोलून अपमानीत केले, असा आरोप केला. ते काही नाही माझ्या बिलाचा विषयी मिटवा आणि मगच येथून जावा असे म्हणत मंत्री सदा भाऊना हॉटेल मालकाने अडवले.