बारावीच्या (HSC Result 2022) निकाल लागल्यानंतर दहावीचा (SSC Result 2022) निकाल कधी? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. आता मात्र, प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेतलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज, 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याची मंडळाकडून सांगण्यात आले आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन उपलब्ध होतील.
यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा..?
या परीक्षेस 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89,506 मुलं असून मुलींची संख्या 7,49,458 एवढी आहे.
कुठे पाहाता येतील निकाल?
mahahsscboard.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
mahresult.nic.in
निकालानंतर गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल…
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.