कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) सुपरहिट चित्रपट ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2 Movie) चित्रपटगृहांमध्ये हाऊसफूल झाल्यानतंर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज (Bhool Bhulaiya 2 on OTT) होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच रविवारी 19 जून रोजी ऑनलाइन प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. बॉक्स ऑफिसवर कंगना राणौतच्या ‘धाकड’ला (Dhakad) मागे टाकत ‘भूल भुलैया 2’ने कमाईच्या बाबतीत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. कार्तिक आर्यनलाही त्याच्या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. त्याने आधीच्या चित्रपटांमध्येही आपली जादू दाखवली आहे. ‘भूल भुलैया 2’ OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.
कंगना राणौतचा चित्रपट ‘धाकड’ला बॉक्स ऑफिसवर धूळ चारल्यानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘भूल भुलैया 2’ ओटीटीला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘भूल भुलैया 2’ 19 जून 2022 रोजी नेटफ्लिक्सवर (Bhool Bhulaiya 2 On Netflix) प्रदर्शित होईल. याबद्दल कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये कार्तिकने म्हटले की “‘भूल भुलैया’चा आतापर्यंतचा प्रवास खूपच विलक्षण होता. या चित्रपटाने नेटफ्लिक्सवरही प्रवेश केला आहे त्यामुळे मी मी खूप रोमांचित आहे. आम्ही नेटफ्लिक्ससह जगभरातील प्रेक्षकांचे आणि आमच्या सर्व चाहत्यांचे मनोरंजन करत राहू.”
भूल भुलैया 2’ हा 2007 मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजा यांनी भूमिका साकारल्या होत्या. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय तब्बू आणि कियारा अडवाणी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.