पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना.. काही दिवसांपूर्वीच या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.. देशातील तब्बल 10.50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 21 कोटी रुपये पाठवण्यात आले.. त्यानंतर आता शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे..
पीएम किसान योजनेत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये मिळतात.. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 31 मे 2022 रोजी शेवटचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आला. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा झालेले नाहीत.
पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, त्यांनी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे. तेथे ‘फार्मर्स कॉर्नर’वर क्लिक करुन ‘लाभार्थी स्थिती’वर क्लिक करा. तेथे तुम्हाला पैसे न मिळाल्याचे कारण जाणून घेता येईल. चुकीची माहिती दुरुस्त करू शकता. शिवाय हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करूनही मदत घेऊ शकता..
12 वा हप्ता कधी ..?
शेतकऱ्यांना आता या योजनेचा 12वा हप्ता कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता पुढील 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे समजते. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, ‘ई-केवायसी’ करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे.
‘असे’ करा ई-केवायसी..
• सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
• आता इथे तुम्हाला ‘Farmer Corner’ दिसेल, तेथे ‘ई-केवायसी’ (E-KYC) वर क्लिक करा.
• आता एक नवीन पेज उघडेल, तेथे तुम्हाला आधार क्रमांक टाका व ‘सर्च’वर क्लिक करा.
• आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ‘ओटीपी’ पाठवला जाईल.
• नंतर ‘सबमिट ओटीपी’वर क्लिक करा.
• आधार नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ‘ओटीपी’ टाकला, की तुमचे ‘ई-केवायसी’ पूर्ण होईल..
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत ‘ई-केवायसी’ करणाऱ्या शेतकऱ्यांनाच 12वा हप्ता मिळू शकतो. त्यासाठी ‘पीएम किसान योजने’च्या वेबसाइटला भेट देऊन, किंवा ‘सीएससी’ (CSC) केंद्राला भेट देऊनही ‘ई-केवायसी’ करता येणार आहे..