Thursday, July 31, 2025
Homeराजकीय घडामोडीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या होणार शस्त्रक्रिया ; आज होणार वैद्यकीय...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या होणार शस्त्रक्रिया ; आज होणार वैद्यकीय चाचण्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांना हिप बोनचा (Hip Bone) त्रास आहे. त्यांच्यावर रविवारी म्हणजेच 19 जून रोजी शस्त्रक्रिया (Hip Bone Surgery) करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे आज (18 जून रोजी) मुंबईतील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल होणार आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रियेपूर्वी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या (Medical Test) केल्या जातील. त्यानंतर त्यांच्यावर रविवारी शस्त्रक्रिया (Raj Thackeray Surgery) केली जाईल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दोन महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

याआधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी राज ठाकरे रुग्णालयात देखील दाखल झाले होते. मात्र वैद्यकीय चाचणी दरम्यान त्यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. या डेस सेल्समुळे त्यांना अॅनास्थेशियाचे इंजेक्शन देणे शक्य नव्हते त्यामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान राज ठाकरे मे महिन्यात पुणे दौऱ्यावर होते तेव्हा ते त्रास वाढल्यामुळे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले होते. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा देखील स्थगित केला होता. राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 5 जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पायांचे दुखणे वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिल्याने राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित केला.

या कारणामुळे झाली दुखापत
काही दिवसांपूर्वी टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीचा त्रास वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ही शस्त्रक्रिया होत आहे. यासाठी ते आज लिलावती रुग्णालयात दखल होत आहे. उद्या ही शस्त्रक्रिया पार पडेल.

हिप बोन म्हणजे काय
कमरेच्या हाडांना होणारा त्रासाला म्हणजे हिप बोन म्हटले जाते. हा त्रास रोज जाणवत नाही मात्र अचानक शरीराच्या एका विशिष्ट भागात हा त्रास जाणवतो. सांध्यांमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. स्नायू आणि हाडांवर जास्त दबाव पडल्यामुळे ही समस्या निर्मण होते. अधिक तास काम करणे, एकाच स्थितीत बसून राहणे, कॅल्शियमची कमतरता आणि बदललेली जीवनशैली यामुळे ही समस्या निर्माण होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -