ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. पण अजूनही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. राज्यातील जनता उकाड्यामुळे हैराण असून पावसाची आतुरतेना वाट पाहत आहेत. अशामध्ये उद्यापासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत पुणे आणि परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील पाच दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. अशामध्ये मान्सूनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. बळीराजा देखील पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. पेरण्या रखडल्या आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. म्हणावा तसा पाऊस पडत नसल्यामुळे राज्यावर पाणी टंचाईचे संकट आहे.