Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दुचाकी चोरांना बेड्या

कोल्हापूर : दुचाकी चोरांना बेड्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतून भरदिवसा दुचाकी चोरणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील टोळीला जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. त्यांच्यांकडून साडेसहा लाख रुपये किमतीच्या 24 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातीलही वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहेत.



टोळीचा म्होरक्या अलंकार बाबुराव पाटील (वय 21, रा. सावे, ता. शाहूवाडी), अमर निवास खामकर (25, साखरे गल्ली, शिवाजी स्टेडियमजवळ, मलकापूर, शाहूवाडी), करण विठ्ठल शिंदे (बावी, ता. उस्मानाबाद), अभिषेक सचिन सपाटे (20, रा. मलकापूर), सुशांत बबन कांबळे (22, परळे, ता. शाहूवाडी), सुशांत चंद्रकांत गायकवाड (24, येळाणे, ता. शाहूवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य संशयित अलंकार पाटील, अमर खामकर यांना न्यायालयाने 21 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयितांना रविवारी (दि.19) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संशयितानी वाहन चोरीच्या 24 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. टोळीने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, चिकोडी, हुबळी परिसरातही चोरीचे गुन्हे केले असावेत, असा संशय शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी व्यक्त केला. चोरट्यानी जुना राजवाडा 10, शाहूपुरी 5, लक्ष्मीपुरी 5, गांधीनगर व कळे पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. महागड्या दुचाकी चोरीसाठी एक आणि विक्रीसाठी दुसरी टोळी कार्यरत होती, अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे, असेही चव्हाण, नाळे यांनी सांगितले. टोळीत सहापेक्षा अधिक संशयितांचा समावेश असावा, असेही सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -