Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगतब्बल पाचशे वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकला महाकाली मंदिरावर पताका

तब्बल पाचशे वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकला महाकाली मंदिरावर पताका

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिरावर बनविण्यात आलेला दर्याची देखभाल करणाऱ्याच्या सहमतीने स्थलांतर करण्यात आले. यानंतर शनिवारी (दि. १८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या शिखरावर पतका फडकवला. तब्बल ५०० वर्षांनंतर या मंदिरावर हा पताका फडकावला गेला.


यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “महाकाली मंदिरावर फडकवण्यात आलेला पताका हा आध्यात्मिकतेचे प्रतिक आहे. शिवाय अनेक वर्षे उलटून गेल्यावर देखील आपली आस्था किती मजबूत आहे हे सिद्ध करते. या मंदिरावर मागील पाचशे वर्षांपूर्वी पासून ते स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेल्यानंतर पताका फडकला गेला नव्हता”. पावागड डोंगरावर ११ व्या शतकात बनविण्यात आलेल्या मंदिराचे पुनर्विकास योजनेंतर्गत पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आले. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महाकाली मंदिराचे उद्घाटन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -