Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगबिहारमध्ये अकरा जिल्ह्यात इंटरनेट बंद

बिहारमध्ये अकरा जिल्ह्यात इंटरनेट बंद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलात जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर युवक रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.


दरम्यान, सध्याची अशांततेची परिस्थिती लक्षात घेता बिहार सरकारने एकूण बारा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बिहार सरकारने कैमेर, भोजपूर, औरंगाबाद, बक्सर, नावाडा, पश्चिम चंपारण, समस्तीपूर, लखीसराय, बेगुसराय, वैशाली आणि सारण या एकूण अकरा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -