Wednesday, August 27, 2025
HomeमनोरंजनRanbir Kapoor च्या 'Shamshera'चा पोस्टर झाला लीक, लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Ranbir Kapoor च्या ‘Shamshera’चा पोस्टर झाला लीक, लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का!

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी चित्रपट ‘शमशेरा’ (Shamshera Movie) बाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. रणबीर कपूरचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त संजय दत्त (Sanjay Dutt) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला (Shamshera Teaser) प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. टीझर पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. अशामध्ये आता या चित्रपटातील मुख्य अभिनेता रणबीर कपूरचा नवा लूक लीक (Ranbir Kapoor Shamshera Look) झाला आहे. रणबीर कपूरचा हा लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

3 वर्षांनंतर रणबीर कपूरचे दोन मोठे चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’ रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. ‘शमशेरा’ 22 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे, तर ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. अशामध्ये शमशेरामधील रणबीर कपूरच्या फर्स्ट लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटातील रणबीरचा नवा आणि दमदार लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रणबीरचा हा लूक पाहून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त उत्सुकता वाढली आहे.

शमशेरा’ या अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक सर्वांनाच भुरळ घालत आहे. अशामध्ये गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त देखील दिसले होते. मात्र, रणबीरचा आताचा लूक टीझरपेक्षा खूपच वेगळा आहे. पोस्टरमध्ये रणबीर लांब केस आणि दाढीमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात शस्त्र आहे. आता या चित्रपटातील रणबीर कपूरचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यशराज मुव्हीजच्या बॅनरखाली तयार झालेल्या रणबीरचा हा चित्रपट 1800 च्या दशकातील कथा आहे. ज्यामध्ये तो आपल्या स्वातंत्र्य आणि अधिकारांसाठी ब्रिटिशांशी लढताना दिसणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -