दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अहमदनगर येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती होत आहे, त्यासाठी नेमकी पात्रता काय, अर्ज कुठे व कधीपर्यंत करावा लागेल.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
एकूण जागा : 67
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
स्वयंपाकी
पदसंख्या : 10 जागा
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेलं असावं
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक
वयोमर्यादा – 18 ते 25
वार्ड सहायिका
पदसंख्या : 57 जागा
शैक्षणिक पात्रता
दहावीपर्यंत शिक्षण
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण
संबंधित पदाचा किमान अनुभव
पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.
वयोमर्यादा – 18 ते 25
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2022
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : पीठासीन अधिकारी (BOO-III), मुख्यालय दक्षिणी कमांड, c/o मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर.