Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : मातोश्रीवरुन थेट फोन; आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईला रवाना

कोल्हापूर : मातोश्रीवरुन थेट फोन; आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईला रवाना

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मंगळवारी सकाळी मुंबईला रवाना झाले. विधान परिषद निवडणूक झाल्यावर ते कालच जयसिंगपूरला आले होते. शिवसेनेत आमदारांचे नाराजी नाट्य सुरू झाल्यावर त्यांना मातोश्रीवरून फोन आला व ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.

राज्यमंत्री यड्रावकर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. पण गेल्या निवडणुकीत त्यांचा शिरोळ मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेल्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आणि तातडीने शिवसेनेला पाठिंबा दिला. नंतर त्यांनी पक्षाचे शिवबंधन बांधले. त्यांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद दिले. त्यांना सत्तेची संधी मिळाल्याने शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर तेव्हा नाराज झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -