Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'वर्षा' बंगला सोडला, मुक्काम आता 'मातोश्री'वर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला, मुक्काम आता ‘मातोश्री’वर


मुंबई, मुख्यमंत्रिपद किंवा पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मी नालायक आहे, असे कोणाला वाटत असेल; तर मला समोर येऊन सांगा. मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. मी राजीनामा तयार ठेवतोय, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी बुधवारी ऑनलाईन संवाद साधला आणि रात्री ‘वर्षा’ बंगला सोडून ते ‘मातोश्री’ मुक्कामी पोहोचले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच राज्यभरातील शिवसैनिकांशी आणि जनतेशीही संवाद साधला. भाजपसोबत सरकार स्थापन करा, ही शिंदे यांची मुख्य मागणी आहे. मात्र, या मागणीवर कोणतेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले नाही. उलट समोर येऊन राजीनामा मागा; मुख्यमंत्रिपदच काय, शिवसेना पक्षप्रमुख पददेखील सोडण्यास आपण तयार आहोत, असे जाहीर करत उद्धव यांनी या संघर्षाचा चेंडू शिंदेंकडे टोलवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -