Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर :मध्यवर्ती बसस्थानक बनले 'लुटारूंचा अड्डा'

कोल्हापूर :मध्यवर्ती बसस्थानक बनले ‘लुटारूंचा अड्डा’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर; मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने, पर्स, मोबाईल पळविण्याच्या घटना दिवसाआड घडताना दिसतात. बाहेरगावी जाणारे अनेक प्रवासी त्यांच्या गडबडीमुळे तक्रार न करताच निघून जातात. मात्र, मागील महिन्याभरात 10 तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने, 4 दुचाकी व मोबाईल या परिसरातून चोरीला गेल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ‘मध्यवर्ती बसस्थानक की लुटारूंचा अड्डा’ असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होतो आहे.


कोरोना निर्बंध हटविल्यानंतर आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू झाल्या आहेत. कित्येक दिवसांचा शुकशुकाट अनुभवणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. परंतु यासोबतच प्रवाशांची रेकी करून त्यांना लुटण्याचे, दागिने हिसकावण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. या घटनांमुळे मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवासी तसेच परिसरातील सुरक्षितताही धोक्यात आली आहे.


फलाटावर प्रकार
एसटी बसेस आल्यानंतर फलाटावर प्रवाशांची गर्दी होते. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी प्रयत्न करत असतात. अशावेळी दरवाजामध्ये चेंगराचेंगरीचा प्रकार घडतो. नेमका याचाचा फायदा घेत चोरटे महिलांच्या पर्स, गळ्यातील दागिने, प्रवाशांच्या खिशातील मोबाईल, रकमेवर डल्ला मारत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -