Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरजोतिबा रोडवरील फेरीवाल्यांवर कारवाई

जोतिबा रोडवरील फेरीवाल्यांवर कारवाई


ताजी बातमी ऑनलाईन टीम
महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत जोतिबा रोडवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांव विक्रीसाठी जादा जागेवर साहित्य मांडलेल्या ११ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये २ लोखंडी बाकडी स्टँड, १० लोखंडी जाळी स्टँड, १ लोखंडी रॅक, २ ताडपत्री, १ हातगाडी, २ लोखंडी टेबल, ४ रिकामे कोट, १ फायबर स्टुल, १ छत्री स्टँड, १ वजन काटा, ३ वजने इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर बिंदू चौक, दाभोळकर कॉर्नर, उमा चौक, बिंदू चौक, गोकुळ हॉटेल, कावळा नाका, शाहू नगर येथील अनाधिकृत ७ डिजीटल बोर्डवर कारवाई करुन जप्त करण्यात आले. सदरची कारवाई १ डंपर व २० अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -