Tuesday, July 8, 2025
Homeमनोरंजनश्रीवल्लीसोबत Pushpa 2 मध्ये काय होणार? डायरेक्टरने केला मोठा खुलासा

श्रीवल्लीसोबत Pushpa 2 मध्ये काय होणार? डायरेक्टरने केला मोठा खुलासा


अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’चा (Pushpa) फिवर अजून कमी झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. अजूनही प्रत्येकाच्या ओठांवर पुष्पा चित्रपटाचे गाणे आणि डायलॉग (Zukega nahi saala) आहे.

पुष्पामध्ये साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसले होते. पुष्पाने यशस्वी कामगिरी केल्यानंतर पुष्पा 2 चे शुटिंगचे काम सुरू झाले आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगचे काम सुरू झाले आहे. पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हीच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील प्रमुख पात्र ‘श्रीवल्ली’च्या मृत्यू होणार की नाही, याबाबत निर्माता यांनी मोठा खुलासा केला आहे.

400 कोटींचा प्रोजेक्ट…
पुष्पाचे निर्माता वाय. रविशंकर (Y. Ravi Shankar) यांनी पिंकविलाशी बोलताना सांगितले, की ‘पुष्पा’ चित्रपटाचा 195 कोटी रुपये बजेट होता. परंतु आता पुष्पा-2 साठी सुमारे 400 कोटी रुपयांचा बजेट असणार आहे. वाढीव बजेटमध्ये स्पेशल इफेक्ट्स, प्रमोशन, सेट डिझाइनवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पुष्पा-2 च्या शूटिंगची तयारी जोरात सुरू आहे. चित्रपटाचे शुटिंग येत्या ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

‘श्रीवल्ली’चा मृत्यू होणार नाही…
रविशंकर म्हणाले, ‘पुष्पा-2’मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हेच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पुष्पा 2 मध्ये पुष्पाचा मृत्यू होणार नाही, असे देखील रविशंकर यांनी स्पष्ट केलं आहे. आगामी पुष्पा 2 मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होईल, असे वृत्त आहे. परंतु ती अफवा असल्याचे रविशंकर यांनी म्हटले आहे. पुष्पा 2 मध्ये ‘श्रीवल्ली’ दिसणार असून ती प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन देखील करणार आहे.

गेल्या वर्षी रिलीज झाला होता ‘पुष्पा : द राइज’
‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज झाला होता. तमिळ, तेलुगु, हिंदी, मलयालम आणि कन्नड भाषांमध्ये हा चित्रपट एकाच वेळी रिलीज झाला होता.
अल्लू अर्जुनने या चित्रपटात ‘पुष्पराज’ आणि रश्मिका मंदाना हिने ‘श्रीवल्ली’ची भूमिका केली. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद दिली. पुष्पाच्या हिंदी व्हर्जनने 110 कोटी रुपयांची कमाई केली होती. तेव्हापासून प्रेक्षकांना पुष्पा-2 ची प्रतिक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -