Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी

निगवे दुमाला ते वडणगे या रोडवर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की यातील संशयित आरोपी प्रकाश जमदाडे वय वर्षे सत्तावीस राहणारा आरळे तालुका पन्हाळा हा निगवे दुमाला ते वडणगे या मार्गे येत असताना त्यांच्या ताब्यातील फॅशन दुचाकी गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना वडणगे गावाजवळील पाटील मळा येथे निगवे दुमाला ते वडणगे जाणाऱ्या रोडवर अचानक पणे कुत्रा आडवा आल्याने त्यांचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांच्यावर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून याबाबत फिर्याद श्रीकृष्ण उत्तम जमदाडे वय वर्षे एकवीस राहणार चांदोली वसाहत आरळे तालुका पन्हाळा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित आरोपी वैभव जमदाडे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -