Tuesday, July 8, 2025
Homeसांगलीसांगली : कृष्णेत पाणी सोडले; नागरिकांना दिलासा

सांगली : कृष्णेत पाणी सोडले; नागरिकांना दिलासा

साटपेवाडी बंधाऱ्यातून कृष्णा नदीत पाणी सोडल्याने तसेच सांगली बंधाऱ्याला दोन फुटापर्यंत फळ्या लावल्याने इंटेकवेलपर्यंत पाणी पातळीत थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे शहराच्या पाणी प्रश्नी थोडासा दिलासा मिळाला आहे.

सांगली बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने तसेच पाऊस लांबल्याने कृष्णा नदीत पाणी पातळी निच्चांकी स्तरावर गेली होती. त्याचा परिणाम सांगली व कुपवाड शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला. नदीतील इंटेकवेलमधून प्रतितास 35 लाख लिटर पाणी उपशाऐवजी 30 लाख लिटरपर्यंत उपसा होऊ लागला. रोज सुमारे 1 कोटी लिटर पाणी उपसा कमी झाला. त्याचा थेट परिणाम सांगली व कुपवाडच्या पाणीपुरवठ्यावर झाला. पाणी टंचाई जाणवू लागली.

कृष्णा नदीत पुरेशी पाणी पातळी ठेवण्यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या निर्देशानुसार दि. 16 जून रोजी साटपेवाडी बंधाऱ्यातून 500 क्युसेक डिस्चार्जने पाणी कृष्णा नदीपात्रात सोडले. दि. 20 जून रोजी 1 हजार 200 क्युसेकने पाणी सोडले. त्याचबरोबर सांगली बंधाऱ्याला दोन फुटापर्यंत फळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे सांगली बंधाऱ्याजवळ पाणी पातळी सुमारे 3 फूट इतकी झाली आहे. महापालिकेच्या इंटेकवेलजवळील पाणी पातळीतही थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी उपशात थोडी सुधारणा झाली आहे. निर्माण झालेल्या पाणी प्रश्नी तेवढाच दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -