Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रपालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या सराईताला पाठलाग करून पकडले

पालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या सराईताला पाठलाग करून पकडले

शहरात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे. या सोहळ्या दरम्यान मोबाइलची चोरी करणार्या सराईत चोरट्याला युनिट 2 च्या पथकाने पाठलाग करून पकडले. प्रेमराज राजेश पट्टपु (22, रा. शिंदेवस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीत त्याचा साथीदार दिपक उर्फ दिप्या (रा. देहुरोड) यांच्या मदतीने साधु वासवाणी चौकाजवळ वुडलँड हॉटेल येथे मोबाईल हिसकावल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न असून प्रेमराजच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

शहरात पोलिसांकडून मोठ्याप्रमाणावर बंदोबस्त नेमण्यात आलाआहे. त्याच अनुषंगाने युनिट 2 चे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, उपिनीक्षक नितीन कांबळे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एकजण संशयीतरित्या फिरत असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असताना तो पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडले. अमंलदार शंकर नेवसे, गजानन सोनुने, कादीर शेख यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -