Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगएकनाथ शिंदे गटाला BJP कडून मोठी ऑफर ; आमदारांना राज्यात मिळणार मोठी...

एकनाथ शिंदे गटाला BJP कडून मोठी ऑफर ; आमदारांना राज्यात मिळणार मोठी पदे

शिवसेनेसोबत बंड करत स्वतंत्र गट निर्माण केलेल्या एकनाथ शिंदे यांना आता भाजपकडून सत्ता स्थापन करण्याचे आवाहन करत मोठी ऑफर देण्यात आली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला राज्यात आठ कॅबिनेट मंत्रिपदे आणि पाच राज्यमंत्रिपदे देण्याचा विचार भाजपकडून केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले असून कोणत्याही क्षणी भाजपकडून शिंदे गटाला एकत्र घेत संख्याबळ असल्याचे सांगत नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकणार आहे. या दरम्यान आता भाजपमधील
काही नेत्यांकडूनही एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपमध्ये सहभागी व्हावे, असे सांगितले जात आहे.

या दरम्यान आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आपल्यासोबत यावे अशी चर्चा केली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर आपल्यासोबत आल्यास गटातील नेत्यांपैकी काही नेत्यांना आठ कॅबिनेट मंत्रीपदे तर काहींना राज्यमंत्रिपदे देण्यात येईल, असेही सांगितले जाईल. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेकमी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -