Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, राजेश क्षीरसागर यांच्याघरावर काढला मोर्चा

कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, राजेश क्षीरसागर यांच्याघरावर काढला मोर्चा

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. राजेश क्षीरसागर हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील एकत्र फोटो समोर आला आहे. राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामिल झाल्याने कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी आज राजेश क्षीरसागर यांच्या घरावर आज मोर्चा काढला. आक्रमक पावित्रा घेत, घोषणाबाजी करत शिवसैनिक मोर्चात सामील झाले होते. मोर्चात महिलांचा अधिक समावेश आहे.

जे काही गेलेत ते कावळे आणि जे उरले ते मावळे
स्थानिक प्रंचड नाराज झाले आहेत. जे काही गेलेत ते कावळे आणि जे उरले आहेत ते मावळे. अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. महिला शक्ती ताकदीने उभा राहणार आहे. उध्दव ठाकरे आणि मातोश्रीच्या पाठीमागे आम्ही सदैव कायम राहणार आहे, अशा प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -