Friday, November 22, 2024
Homeबिजनेससोने खरेदीची संधी, दरात झालीय मोठी घसरण, चांदीच्या किंमती वाढल्या..!!

सोने खरेदीची संधी, दरात झालीय मोठी घसरण, चांदीच्या किंमती वाढल्या..!!

सोने खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात तेजीचे वातावरण असतानाही, भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. मात्र, दुसरीकडे चांदीच्या दरात काहीसी वाढ झाली. सोन्याचा दर आज 50,500 रुपयांच्या खाली, तर चांदी अजूनही 60 हजारांच्या खाली विकली जात आहे.

‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर (MCX) आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरला. त्यामुळे सोन्याचा दर 50,485 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागणी मंदावल्याने सोने 0.22 टक्क्यांनी घसरल्याचे दिसते. दुसरीकडे चांदीला मात्र झळाळी आल्याचे दिसते.

‘एमसीएक्स’वर आज (ता. 24) सकाळी चांदीच्या भावात 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव 59,536 रुपये प्रति किलोवर गेला असला, तरी हा भाव अजूनही 60 हजारांच्या खालीच असल्याचे दिसते. मागणी वाढल्याने चांदीच्या भावात 0.05 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली.

प्रमुख शहरातील सोन्याचे दर (प्रति तोळा)

पुणे –
22 कॅरेट – 47,520 रुपये
24 कॅरेट- 51,810 रुपये

मुंबई –
22 कॅरेट -51,760 रुपये
24 कॅरेट – 52,070 रुपये

नागपूर –
22 कॅरेट – 47,520 रुपये
24 कॅरेट- 51,810 रुपये

भारतात सोन्याच्या दरात घसरण सुरु असताना, दुसरीकडे जागतिक बाजारात मात्र सोन्या-चांदीने चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसते.. अमेरिकन बाजारात आज सोन्याची स्पॉट किंमत 1,824.89 डॉलर प्रति औंस होती. तसेच, चांदीची स्पॉट किंमत $21.03 प्रति औंस झाली आहे..

दरम्यान, आगामी काळात सोन्याच्या दरात दुपटीने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.. पुढील 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाण्याचे संकेत ‘क्‍वाड्रिगा इग्नियो फंड’ (Quadriga Igno Fund) यांच्याकडून देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -