Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगब्रेकिंग : पावसाबाबत हवामान विभागाची मोठी अपडेट..

ब्रेकिंग : पावसाबाबत हवामान विभागाची मोठी अपडेट..

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांत मुसळधार पाऊस पडत असल्याने उष्णतेची लाट नरमली आहे. दरम्यान, कर्नाटक, केरळ, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लागणार असे सांगितले आहे. शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून आपल्या राज्यातील शेतकरी बांधव पेरणीसाठी वेग धरला आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार..

बंगालच्या उपसागरापासून ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतात दक्षिण, नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावामुळे 25 आणि 26 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 23 आणि 24 तारखेला विदर्भात पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. सोमवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण, गोव्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 27 जूनपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

आसाममध्ये पूर परिस्थिती

आसाममधील पूरग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये NDRF च्या 26 तुकड्या बचावासाठी दाखल राज्यात 16 जूनपासून बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. यादरम्यान नऊ जणांचे प्राण वाचले आहेत. एनडीआरएफने सांगितले की, राज्यातील 54.5 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. आणखी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, मेच्या मध्यापासून पुरामुळे मृतांची संख्या 101 वर पोहोचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -