Homeसांगलीसांगली : पैशाचा पाऊस; भोंदूबुवासह चौघे जेरबंद

सांगली : पैशाचा पाऊस; भोंदूबुवासह चौघे जेरबंद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली ; पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सुनील मोतीलाल व्हटकर (वय 57, रा. बुधवार पेठ, सोलापूर) यांना पंधरा लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबुवासह चौघांना अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना शुक्रवारी यश आले. चौघांकडून दीड लाखाची रोकड व दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.



अटक केलेल्यांमध्ये भोंदूबुवा रोहित भालचंद्र बेन्नाळकर उर्फ शंकर महाराज (वय 34, रा. अकलूज, जि. सोलापूर), संदीप सुभाष पाटील (41, अंजनी, ता. तासगाव), रोहित महादेव ऐवळे (32, खणभाग, सांगली) व अरुण शिवलिंग कोरे (33, म्हैसाळ, ता. मिरज) यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना 28 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अटकेतील संशयितांची संख्या आता सहा झाली आहे. यापूर्वी अटक केलेल्या सांगलीतील बादशहा पाथरवट (35), त्याची पत्नी आसमा (30) या दोघांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. दरम्यान, आता या प्रकरणातील शिवानंद शरणाप्पा हाचंगे (60, विडी घरकूल, सोलापूर) हा अजूनही फरारी आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

फिर्यादी सुनील व्हटकर हे सोलापुरात शेती करतात. कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी काही दिवसापूर्वी शंकर महाराज याची भेट घेतली. शंकरने कौटुंबिक अडचणीवर काही उपाय सांगितले. तसेच पैशाची अडचण असेल तर सांगा, तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून देतो’, असे सांगितले. व्हटकर तयार झाले. यासाठी शंकरने त्यांना 25 लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले. चर्चेअंती 15 लाख रुपये देण्याचे व्हटकर यांनी मान्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -