वर्षभरात आरबीआय ने अनेक नियम आणले, सरकारने अनेक योजना राबवत काही आर्थिक बाबींशी निगडित केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विभागांसाठी निर्णय घेतले, आता जुलै महिना सर्वसामान्यांसाठी खिशाला झळ बसवणारा आहे. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.
1. आधार-पॅन कार्ड लिंक शुल्क: CBDT ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, 1 जुलै 2022 पासून आधार कार्ड पॅनसोबत लिंक करायचं असल्यास ग्राहकांना आता 500 रुपये नव्हे तर 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर तुम्ही तुमचे आधार-पॅन लिंकिंग (Aadhaar-PAN Linking) केले नसेल, तर ते लवकर करा. CBDT ने 29 मार्च 2022 रोजी अधिसूचना जारी केल्याचं समजतंय.
2. बँकेचे शुल्क वाढले: भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने बेसिक सेव्हिंग डिपॉझिट अकाऊंटच्या शुल्कात काही बदल केले आहेत आणि ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी व चेकने पैसे भरण्यासाठी नवीन सेवा शुल्क भरावे लागणार आहे. बेसिक सेव्हिंग डिपॉझिट अकाऊंटच्या ग्राहकांना महिन्यातून फक्त 4 वेळा एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोफत व्यवहार मिळणार आहेत. पण त्यापेक्षा जास्त पैसे काढायचे असल्यास 15 रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल. एसबीआय ग्राहक 10 पानांचा चेक वापर करू शकतो, जर अतिरिक्त चेक वापरले तर 10 अतिरिक्त चेकना 40 रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल तर 25 चेकसाठी 75 रुपये प्लस जीएसटी भरावा लागणार आहे.
3. LPG गॅस सिलिंडरच्या किंमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी वाढत असतात. यंदा 1 जुलै रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
4. दुप्पट कापला जाईल टीडीएस: जर तुम्ही अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरला नसेल तर 1 जुलै आधीच तुम्हाला हे काम करावं लागेल, कारण तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असली तरी, ज्यांची टीडीएस रक्कम 50 हजार रुपये किंवा त्याहून जास्त आहे आणि त्यांनी 2 वर्षांपासून आयटीआर दाखल केलेला नसेल, तर आता 1 जुलै 2022 पासून टीडीएस 10 ते 15 टक्के कापला जाईल. पूर्वी हा हिस्सा 5 ते 10 टक्के होता.
5. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये जावं लागणार नाही: शिकाऊ वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी 1 जुलैपासून कार्यालयात जाणे आवश्यक असणार नाही. तुम्हाला नोंदणीकृत प्रशिक्षण शाळेमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर पूर्ण प्रशिक्षणानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते.
6. नवीन IFSC कोड: देशातील आणखी एक बँक म्हणजे कॅनरा बँक या बँकेच्या विलीनीकरणानंतर आता सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवीन IFSC कोड जारी केला जाऊ शकतो.
7. दहा हजार रुपयांपेक्षा जास्त व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीच्या पेमेंटवर 1 टक्के टीडीएस कपात करण्याच्या नियमांबाबत सरकारने अधिसूचना जारी केली असल्याची माहीती आहे.
8. देशातील मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पने 1 जुलैपासून मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती वाढवणार आहे, अशी घोषणा केली आहे. Hero MotoCorp ने आपल्या सर्व मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती 3,000 रुपयांपर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. नवीन किंमती 1 जुलै 2022 पासून लागू होऊ शकतात.





