ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत राज्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप केला आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत जवळपास 46 आमदार त्यांच्या गटामध्ये सहभागी झाले. त्यामुळे आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अशामध्ये आता शिवसेना आक्रमक झाली आहे. बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवावे यासाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांना नोटीस देखील पाठवल्या जाणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाविरुद्ध एकनाथ शिंदे गट असा संघर्ष पेटला आहे. परंतु शिवसेना शेवटच्या क्षणी बाजी पलटवू शकते, अशी भीती एकनाथ शिंदे आणि भाजप आहे. त्यामुळे त्यांनी आधीच प्लान बी तयार करून ठेवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागून सूत्र हलवत असल्याची माहिती आहे. भाजप यावेळी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
राज्यातील या राजकीय वातावरणामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिक राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतील यासाठी गृहखात्याकडून राज्यभरातील पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात सुरू राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही नवी घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंवर तूर्तास कारवाई नाही, शिवसेनेच्या नेतेपदी कायम
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -