Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ६ ठराव मंजूर; बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ६ ठराव मंजूर; बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली असून, शिवसेनेने शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवत पुढच्या लढाईच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे ठराव मंजूर केले. या ठरावानुसार बडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले आहेत. बैठकीनंतर बंडखोरांवर संध्याकाळपर्यंत कारवाई होईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिले. जे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत त्यांची मंत्रिपदे काढण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.


शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शक ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केला. तसेच त्यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका जिंकण्याचा विश्वासदेखील राष्ट्रीय कार्यकारिणीने यावेळी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -