Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरलोकराजा शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

लोकराजा शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 148 वी जयंती रविवार दि. 26 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शासनासह तालीम संस्था-तरुण मंडळे, शाहूप्रेमी संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाहू जन्मस्थळी अभिवादन, भव्य मिरवणूक, व्याख्यानमाला, शाहूकालीन दुर्मीळ कागदपत्रे व छायाचित्रांचे प्रदर्शन, शाहू यात्रा, समता दिंडी, रक्तदान, वृक्षारोपण यासह प्रबोधनात्मक कृतिशील उपक्रमांचा समावेश आहे.

अभिवादन आणि मिरवणूक
राजर्षी शाहू जयंती लोकोत्सव समिती व सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे दि. 26 रोजी, सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी चौक व मिरजकर तिकटी येथे राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास अभिवादन आणि सायंकाळी 4 वाजता भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक प्रश्नांसह लोकप्रबोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा सहभाग असणार आहे.

शाहू मिलचा भोंगा वाजणार
रोजगार निर्मितीसाठी राजर्षी शाहूंनी निर्माण केलेल्या शाहू मिलचा भोंगा अनेक वर्षांपासून बंद आहे. यंदाच्या शाहूजयंतीनिमित्त हा भोंगा पूर्ववत वाजविण्यात येणार आहे. दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता शाहू महाराज, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व शाहू मिलचे माजी कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचे ‘मावळा कोल्हापूर’चे अध्यक्ष उमेश पोवार यांनी सांगितले.

विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर मध्ये हजर राहावे ; उमेश पवार

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -