Tuesday, July 8, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक! फक्त 10 मिनिटं उशीर झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

धक्कादायक! फक्त 10 मिनिटं उशीर झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

ताजी बातमी ऑनलाईन टीम
सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चप्पलने बेदम माराहण केली आहे. महत्वाचे म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर ही मारहाण करण्यात आली आहे. शिक्षिका शाळेत उशिरा आल्यामुळे मुख्याध्यापकाचा रागावरील ताबा सुटला आणि त्याने शिक्षिकेला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील राग आल्याशिवाय राहणार नाही. या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या एका सरकारी शाळेमध्ये ही घटना घडली आहे. खेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माहुंगू गावातील शाळेत हा प्रकार घडला आहे. मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चप्पलने बेदम मारहाण केली आहे. माराहण करण्यामागे अतिशय शुल्लक कारण होते. ही महिला शिक्षिका शाळेमध्ये पोहचायला फक्त 10 मिनिटं उशीर झाल्यामुळे मुख्याध्यापकाने तिला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -