Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञानFacebook लॉगिन करताच बँक अकाऊंट होऊ शकतं खाली; ‘ही’ चूक करण्यापासून स्वतःला...

Facebook लॉगिन करताच बँक अकाऊंट होऊ शकतं खाली; ‘ही’ चूक करण्यापासून स्वतःला आवरा

जगभरात मागील काही काळापासून फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर कमालीचा वाढला आहे. मात्र आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील फेसबुक अकाऊंट्स सध्या धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुक युझर्सला लक्ष्य करण्यासाठी हॅकर्स एका विशेष पद्धतीचा वापर करत आहेत. याद्वारे हॅकर्सनी आता जगभरातील 50 लाखांपेक्षा जास्त युझर्सना टार्गेट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोबाईलमधून फेसबुक मेसेंजर वापरणाऱ्यांना यामध्ये मुख्यतः टार्गेट केले जात आहे.

अँटी फिशिंग ब्राऊझर एक्सटेन्शन PIXM च्या निक एस्कोली यांनी ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. अनेक वेबसाईट या फेसबुक लॉगिन पेजसारख्या आहेत आणि त्यामध्ये युझर्स फेसबुक समजून आपली सर्व माहिती भरतात. या वेबसाईटच्या लिंकचा मेसेंजरच्या माध्यमातून वेगानं प्रसार होत असल्याचं निक एस्कोली यांच्या टीमला आढळून आलं आहे. विशेष म्हणजे हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.

नुकतीच त्याची माहिती मिळाल्याने आता यावर उपाय काय काढायचा याबाबत सध्या विचार सुरु आहे. एखाद्या युजरची फेसबुकची माहिती नकली वेबसाईटवर भरली तर त्यांना एका जाहिरातीच्या पेजशी जोडले जाते आणि हॅकर्स याच नकली वेबसाईटच्या माध्यमातून महिना शेकडो डॉलर्स कमाऊ शकतात.

आपलं अकाउंट जर आपल्याला वाचवायचं असेल तर कोणत्याही संशयास्पद ऑनलाईन मेसेजवरील लिंकवर अथवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका. कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर पूर्व माहिती न घेता फेसबुक समजून लॉग इन करणं टाळा. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा नकली वेबसाईट आढळली तर तातडीनं त्याची माहिती सायबर क्राईम सेलला द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -