Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीया ठिकाणी एक लाखांचे दागिने दिवसाढवळ्या लंपास

या ठिकाणी एक लाखांचे दागिने दिवसाढवळ्या लंपास

जत शहरातील मंगळवार पेठेत बाजार करत करताना एका दाम्पत्याने पर्स मोटारसायकलला अडकली होती. या पर्समधील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. या पर्समध्ये एक लाखांचे सोन्याचे दागिने होते.

याबाबतची फिर्याद सुभाष चंद्रकांत माने. (मोरे कॉलनी, जत) यांनी जत पोलिसात दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शहरातील सुभाष माने हे त्यांच्या पत्नी शांता हे दोघे ढालगाव येथे जाणार होते. तत्पूर्वी मंगळवार पेठेत बाजार घेण्यासाठी ते गेले होते. त्यांच्या पत्नी शांता यांनी मोटरसायकलला पर्स अडकवली होती. काही वेळातच ही बाबत त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ गाडीकडे धाव घेतली. परंतु चोरट्यांनी पर्स व त्यामधील एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, अर्ध्या तोळ्याची अंगठी, कर्णफुले, सोन्याची चेन असे एक लाखांचे दागिने लंपास केले. त्यांनी बाजारपेठेत शोधाशोध केली. परंतु पर्स मिळाली नाही. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -