बाजारात खाद्यतेलांमधील (edible oil) घसरण सुरूच असून गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेले आणि वनस्पती तुपाच्या दरात मोठी घट झाली. आवक जावक साधारण असल्यामुळे अन्नधान्ये, गूळ, साखरेसह अन्य जिनसांचे दर स्थिर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि पामोलिन तेलाचे (edible oil) दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सध्या आयातही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, उठाव कमी असल्यामुळे खाद्यतेलांमधील घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही सर्वच खाद्यतेत दरात मोठी घट झाली.
पामतेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे 100 ते 125 रुपयांनी तर शेंगदाणा तेलासह अन्य सर्व खाद्यतेलांच्या दरात 50 ते 60 रुपयांनी घट झाली. मागणी अभावी वनस्पती तुपाच्या दरातही 15 किलोमागे शंभर ते सव्वाशे रुपयांनी घट झाली. आवक जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदळाचे दर स्थिर होते. गुळाची आवक कमी प्रमाणात होत असून मागणी चांगली असल्याने दरवाढ कायम असल्याचे सांगण्यात आले. मागणी कमी असल्यामुळे गेल्या आठवड्यातही साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3500 ते 3550 रुपये होता.