Saturday, February 21, 2026
Homeमनोरंजनगुड न्यूज! आलिया रणबीर होणार आईबाबा, फोटो केला शेअर!

गुड न्यूज! आलिया रणबीर होणार आईबाबा, फोटो केला शेअर!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती आई होणार आहे. याची माहिती खुद्द आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिलीय. तिने फोटो शेअर करत ही खुशखबर आपल्या चाहत्यांसाठी दिलीय.

आलिया भट्टने (alia bhatt) अल्ट्रासाऊंडचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला दोन फोटो शेअर शेअर केले आहेत. एका फोटोत ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसते.

तिचे अल्ट्रासाऊंड चेकअप सुरू असून टीव्हीवर तिच्या बाळाच्या फोटोवर तिने हार्ट इमोजी शेअर केला आहे. तिच्यासोबत पाठमोरा एक व्यक्ती दिसततो. कदाचित तो रणबीर कपूर असावा, असा अंदाज लावला जात आहे. आलिया या फोटोमध्ये हसताना दिसतेय. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं आहे- Our baby coming soon

तिने ही पोस्ट करताचं इन्स्टाग्रामवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अनेक चाहत्यांनी 100 हार्ट इमोजी शेअर केलीय. तर तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत सिंह-सिंहिण आणि बछडा दिसत आहे. आपल्या दोघांमध्ये तिसऱ्याचे आगमन होणार असल्याचे संकेत तिने या फोटोच्या माध्यमातून दिले आहेत. दरम्यान, आलिया आणि रणबीर कपूर दोघे आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -