Wednesday, July 30, 2025
Homeराजकीय घडामोडीघाण निघून गेली, ही पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई – आदित्य ठाकरे

घाण निघून गेली, ही पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई – आदित्य ठाकरे

उपाध्यक्षांच्या अपात्रत्रेच्या नोटीसीला सर्वोच्च न्यायालयाकडून 11 जुलै पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांच्यासह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने शिंदे यांच्या याचिकेवर उत्तर देणारे प्रतिज्ञापत्र 5 दिवसांच्या आत फाईल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडी पुढील 11 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

घाण निघून गेली, ही पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई
आता चांगलं काय तरी आपण घडवू शकू
बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यांची टीका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -