Saturday, February 21, 2026
Homeमनोरंजनजाहिरातींपासून करिअरची सुरुवात करणारी जास्मिन भसीन आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'या' कारणामुळे...

जाहिरातींपासून करिअरची सुरुवात करणारी जास्मिन भसीन आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ‘या’ कारणामुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसची (Bigg Boss) माजी स्पर्धक जास्मिन भसीन (Jasmin Bhasin Birthday) आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 जून 1990 रोजी जन्मलेली जास्मिन (Jasmin Bhasin) टेलिव्हिजन जगतातील बड्या अभिनेत्रींपैकी एक असून तिची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ‘दिल से दिल तक’ (Dil Se Dil Tak), ‘नागिन’ (Nagin), ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss) यासह अनेक शोचा भाग असलेली जास्मिनने आपल्या क्यूटनेसने सर्वांची मनं जिंकली आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या विषयी काही रंजक किस्से…

शीख कुटुंबातील जास्मिनचा जन्म 28 जून 1990 रोजी कोटा येथे झाला. तिने कोटा येथूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर जयपूर येथून हॉस्पिटॅलिटी कोर्स केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कमी वयातच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक जाहिराती, प्रिंट आणि टेलिव्हिजनसाठी काम केले.

तमिळ चित्रपटांतून करिअरला सुरुवात
‘डाबर गुलाबरी’ ते ‘हिमालय नीम फेस वॉश’ आणि ‘व्हिस्पर सॅनिटरी पॅड्स’ सारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये जास्मिन दिसली आहे. यासह अनेक म्युझिक अल्बममध्येही तिने काम केले आहे. जास्मिनने 2011 मध्ये ‘वानम’मधून तामिळ चित्रपटात पदार्पण केले होते. जास्मिनचा हा पहिला चित्रपट हिट ठरला होता. नंतर जास्मिन भसीनने तेलगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

2015 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीत –
तामिळ चित्रपटांनंतर जास्मिन पहिल्यांदा टीव्ही शो ‘टशन-ए-इश्क’मध्ये दिसली होती. तिचा हा टीव्हीतील डेब्यू शो आहे. यामध्ये तिचे नाव ट्विंकल तनेजा होते. या शोसाठी जास्मिनला सर्वोत्कृष्ट महिला डेब्यू म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. जस्मिनने 2017 मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई स्टारर शो ‘दिल से दिल तक’ मध्ये सेकंड लीड म्हणून काम केले होते. या शोने तिला एक वेगळी ओळख दिली, त्यानंतर ती 2019 मध्ये ‘दिल तो हैप्पी है जी’ या मालिकेत दिसली. या शोमुळे तिचे घराघरात नाव झाले.

जास्मिनने केला होता आत्महत्येचा प्रयत्न –
जास्मिन ही आज टेलिव्हिज जगतातीळ मोठे नाव आहे. मात्र एक वेळ अशी होती की, करिअरसाठी तिने खूप संघर्ष केले. मात्र तरीही यश न मिळाल्याने हतबल होत तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. खतरों के खिलाडी सीझन 9 मधील एका टास्कदरम्यान जास्मिनने स्वतःतिची वेदना व्यक्त केली होती. जास्मिनने सांगितले की, माझ्या शरीरावर अनेक डाग होते, मी जिथे जिथे ऑडिशनसाठी गेले तिथे मला नाकारण्यात आले. दररोजचे अनेक नकार ऐकून तणावात मी एकाच वेळी अनेक औषधे खाल्ली होती, पण सुदैवाने मी वाचले. आत्महत्येचा हा प्रयत्न आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचेही ती म्हणाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -