महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) दिवसेंदिवस वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. ठाकरे सरकारचे मंत्री आणि शिवसेना तसंच अपक्ष आमदारांनी गुवाहाटी गाठत शिंदे गटामध्ये सहभाग घेतला. या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे पण ते आपल्या अटींवर ठाम आहेत. सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आरोप- प्रत्यारोप सुरुच आहेत.
शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना महाराष्ट्र विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस पाठवली होती. या नोटीस उत्तर दिले नाही तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले होते. पण या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ सिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने अपात्रता नोटीसला उत्तर देण्यासाठीची मुदत 12 जुलैपर्यंत वाढवून दिली. या याचिकेवरील पुढील सुनावणी ही 11 जुलै रोजी होणार आहे.
कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरण
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत बसून मदत केली जाहीर.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार
तर जखमींना 1 लाखांची मदत जाहीर केली आहे.
स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावतीने मदत जाहीर.





