Thursday, August 28, 2025
Homeसांगलीसांगली : लिंगनूरच्या एकास आठ लाखांचा गंडा

सांगली : लिंगनूरच्या एकास आठ लाखांचा गंडा

गुंतवणूक रकमेला भरपूर परतावा देण्याचे आमिष दाखवून लिंगनूर (ता. मिरज) येथील सुनील शिवाजी माळी (वय 42) यांना आठ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक सुदाम रास्ते, निहाल अशोक रास्ते, राजेश दशरथ माळी व शरद व्यंकटेश कुलकर्णी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. ते कुठे राहतात, याची सुनील माळी यांना कल्पना नाही. त्यामुळे संशयितांच्या मोबाईल लोकेशनवरुन पत्ता शोधून काढला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

विश्रामबाग येथे कॉलिटास ॲग्रो अग्जीम सर्व्हिसेस ही कंपनी आहे. तिथे संशयित काम करीत होते. या कंपनीत रक्कम गुंतवणूक केली तर त्याला भरपूर परतावा देण्याचे आमिष दाखविले. यातील संशयित राजेश माळी याची सुनील माळी यांच्याशी ओळख होती. यातून त्याने सुनील यांना रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अन्य तिघांनी गुंतवणूक योजनेची माहिती सांगितली.

गतवर्षी सुनील माळी यांनी चौघांना आठ लाख रुपये कंपनीत
गुंतविण्यासाठी दिले. एक वर्ष झाले तरी त्यांनी गुंतविलेल्या रकमेचा काही परतावा मिळाला नाही. माळी यांनी संशयितांकडे विचारणा केली, पण ते काहीतरी कारण सांगून वेळ मारुन नेत असे. गेल्या आठवड्यात त्यांनी चौघांची भेट घेऊन ‘मला परतावा नको, माझी गुंतविलेली रक्कम परत द्या’, असे सांगितले. यावर त्यांनी रक्कम मिळत नसते, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे माळी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -