Monday, July 7, 2025
Homeसांगलीसांगली : आमणापूरच्या 'त्या' सावकाराला अटक

सांगली : आमणापूरच्या ‘त्या’ सावकाराला अटक

व्याजाने पैसे देऊन गोरगरिबांच्या शेतजमिनी हडप करणाऱ्या आमणापूर (ता. पलूस) येथील खासगी सावकार मुरलीधर जालिंदर मुळीक (वय 43) याच्या मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 11 हजारांची रोकड व कोरे धनादेश जप्त करण्यात आले आहेत.

विठ्ठलवाडी-आमणापूर येथील प्रवीण प्रकाश औटे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी मुळीकविरुद्ध सांगलीत सावकारी कक्षात तक्रार दाखल केली होती. औटे यांनी 2019 मध्ये मुलीच्या लग्नासाठी मासिक 15 टक्के टक्के व्याज दराने मुळीकडून एक लाख 20 हजारांचे कर्ज घेतल होते. या बदल्यात त्यांनी चार लाख 17 हजार रुपये दिले होते. तरीही मुळीकने औट यांच्याकडे दंड व्याजासह अजूनही सात लाख 15 हजारांची मागणी केली होती. औटे ही रक्कम देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याने औटे यांची शेतजमीन हडप केली होती. औटे यांची आजी जनाबाई यांच्या मालकीची आमणापुरात 30 गुंठे जमीन आहे. मुळीकने 21 मे 2019 रोजी आजीकडून कुलमुखत्यारपत्र करून घेऊन ही जमीन स्वतःच्या नावे करून घेतली. त्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे औटे यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली.

मुळीक एअर पिस्टल घेऊन वसुलीसाठी फिरत होता. तक्रार
दाखल होताच पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या पथकाने आमणापुरात छापा टाकून त्याला अटक केली. त्याला बुधवार, दि. 29 जूनरोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. मुळीकने जमीन किंवा घर बळकावले असेल, तर लोकांनी तक्रार करण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -