Sunday, July 6, 2025
Homeनोकरीखुशखबर..! पोलिस भरतीचा ‘जीआर’ निघाला.. तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी होणार भरती..!!

खुशखबर..! पोलिस भरतीचा ‘जीआर’ निघाला.. तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी होणार भरती..!!

राज्याचं राजकारण तापलेलं असताना, महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. राज्यात तब्बल 7231 जागांसाठी पोलिस भरती (Police recruitment) होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या पोलिस भरतीला मंजुरी दिली.. तसा ‘जीआर’ (शासन निर्णय) जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

राज्यात दोन टप्प्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार जागांसाठी पोलिस भरती पूर्ण झालीय.आता दुसऱ्या टप्प्यातील 7231 जागांसाठी भरती होत आहे.दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरतीच्या नियमांत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया तात्काळ राबवण्यासाठी पोलिस महासंचालकांना सूचना दिल्याचे वळसे पाटील म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा होणार आहे. शारीरिक चाचणीसाठी खालीलप्रमाणे गुण दिले जाणार आहेत.

‘पोलीस शिपाई’ पदासाठी शारीरिक चाचणी

पुरुष उमेदवार

1600 मीटर धावणे – 20 गुण
100 मीटर धावणे – 15 गुण
गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवार

800 मीटर धावणे- 20 गुण
100 मीटर धावणे- 15 गुण
गोळाफेक – 15 गुण
महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील ‘सशस्र पोलिस शिपाई’ (पुरूष) पदासाठी 100 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे.

5 किमी धावणे- 50 गुण
100 मीटर धावणे -25 गुण
गोळाफेक – 25 गुण

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार पदानुसार 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. नंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे..

‘अशी’ होणार लेखी परीक्षा..!

लेखी चाचणीत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांवर आधारित प्रश्न असतील. हे प्रश्न बहुपर्यायी प्रकारात असतील.

परीक्षा मराठी भाषेत होईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल.

उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असल्यास उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

ही लेखी परीक्षा ‘ओएमआर’ पद्धतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या 2 वर्षांपासून पोलिस भरतीची प्रक्रिया लांबली होती. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता, मोठ्या प्रमाणावर पोलिस बळाची गरज जाणवत आहे. अखेर राज्य सरकारने ‘जीआर’ जारी केल्याने पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -