मागच्याच आठवड्यात मायक्रोसॉफ्ट विंडोजने आपल्या दोन ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्याचा निर्णय घेतला होता. अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या os 8 & os 8.1या सिस्टिम्स आता लॅपटॉप किंवा पीसीमध्ये चालणार नाहीत. आता गुगलनेही एक महत्वाची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या या निर्णयामुळे युजर्सला धक्का पोहचू शकतो. फेब्रुवारी महिन्यात Google ने वर्कस्पेस युजर्स साठी Hangouts हे अँप अपडेट करत नवीन स्वरूपात आणले होते. मात्र ते लोकप्रिय न ठरल्यामुळे कंपनीने पूर्णतः बंद करून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मच्या सर्व वापरकर्त्यांना Google Chat हा पर्याय देण्यात आलेला आहे.
Google ने एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये खुलासा करताना म्हटलं आहे की, नोव्हेंबर 2022 मध्ये Hangouts हटविण्यात येईल आणि त्यापूर्वी डेस्कटॉप आणि मोबाइल युजर्सना Google Chat वर Migrate म्हणजेच ते वापर करण्याचा पर्याय(सल्ला) देण्यात येईल. Hangouts प्लॅटफॉर्मवरील चॅट डेटा हा जसाच्या तसा Google Chat वर ऑटोमॅटिक उपलब्ध होईल. त्यामुळे युजरकर्त्यांना त्याबाबत चिंता करण्याचे कसलेही कारण नाही.
एवढंच नाही तर युजर्सना प्लॅटफॉर्म एक्स्पायर होण्यापूर्वी त्यांचा सर्व Hangouts डेटा डाउनलोड करण्याचा पर्याय देखील असेल. गुगलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की 28 जूनपासून मोबाइलवर Hangouts वापरणाऱ्यांना एक In App स्क्रिन दिसेल. जी, त्यांना Gmail मधील चॅट अँपवर आणण्यास मदत करेल.
जे जे वापरकर्ते Hangouts Chrome एक्स्टेंशन वापरतात त्यांना वेबवर चॅट एंटर करण्यास किंवा Chat वेब इंस्टाल करण्यासाठी सांगितले जाईल. जुलैमध्ये जे लोक वेबवर Gmail मध्ये Hangouts वापरतात त्यांना पर्याय म्हणून Gmail मधील Chat वर अपग्रेड केले जाईल.