ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे : जुलै महिन्यात देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी (दि.1) जाहीर केला. दरम्यान या अंदाजामध्ये कमी- अधिक पाच टक्के राहण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात 98 ते 102 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यानुसार देशात 96 ते 106 टक्के पाऊस जुलै महिन्यात पडेल. यात उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यत: 94 ते 106 टक्के इतका पाऊस पडेल असा अंदाज आहे.
मात्र, देशातील अनेक भागांत तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम व पूर्वोत्तर भागात तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. जुलैमध्ये ला-निना स्थिती स्थिर राहील, तर सप्टेंबर महिन्यात ती नकारात्मक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात चांगला पाऊस जुलैमध्ये देशात सुमारे 280 मि.मी. पाऊस पडण्याचा अंदाज 1971 ते 2020 या वर्षात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून वर्तविण्यात आला आहे. मध्य भारतात चांगला पाऊस तर दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर पूर्व भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. महाराष्ट्रात सरासरीपेक्ष अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात 98 ते 102 टक्के पावसाची शक्यता आहे.
जुलै महिन्यात देशात 96 ते 106 टक्के पाऊस; महाराष्ट्रात 98 ते 102 टक्के पावसाची शक्यता
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -