ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; तांत्रिक कामासाठी शिंगणापूर उपसा केंद्राकडील वीजपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुईखडी व बावडा जलशद्धीकरण केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्डासह त्यांच्याशी संलग्नित उपनगरे व ग्रामीण भागामध्ये सोमवारी (दि. 4) पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारीही (दि. 5) पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल, असे महापालिकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ए, बी वॉर्ड व त्यास संलग्नित भागांमध्ये फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टरवरील अवलंबून असलेला संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, संपूर्ण मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, विजयनगर परिसर, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, वारे वसाहत, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकरनगर, सुभाषनगर पंपिंगवरील
अवलंबून असणारा परिसर, शेंडा पार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, सुभाषनगर पंपिंगवरील संपूर्ण भागाला पाणीपुरवठा होणार नाही.
त्याचबरोबर वाय. पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी व ई वॉर्ड व त्यास संलग्नित राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहूमिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंशन, पाच बंगला, राजाराम रायफल, माळी कॉलनी, मोहल्ला परिसर, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, समटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडियल सोसायटी, तोरणानगर, काशिद कॉलनी, माने कॉलनी, एस.टी.कॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन, ग्रीन पार्क, गोळीबार मैदान, उलपे मळा, रमण मळा, केव्हिज पार्क, नागाळा पार्क, महावीर उद्यान, कनाननगर, ताराबाई पार्क, कारंडे मळा, सदर बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, महाडिक वसाहत, मार्केट यार्ड, ताराराणी चौक, स्टेशन रोड, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारी पेठ परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येणार आहे.