सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Politics Crisis) अभूतपूर्व ड्राम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार (Rebel MLA) आज मुंबईत (Mumbai) परत येणार आहेत. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) भाजपकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वत: बंडखोर आमदारांना आणण्यासाठी गोव्यात गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलैला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमत सिद्ध केल्यानंतर शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होणार आहे. मात्र, शिंदे गटाला आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे केंद्रातून सुद्धा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपटावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.