जगभरात सध्या ऑनलाईनचा जमाना सुरु झाला आहे. प्रत्येक गोष्ट आता इंटरनेटच्या माध्यमातून आपण ऑनलाईन करू शकतो. गुगलवर काही करायचे असल्यास आपण फक्त एक क्लीक करायचं आणि लगेचच आपल्याला माहिती मिळते. गुगलवर सर्वच गोष्टी सर्च करणं हे शक्य नाही. कारण काही गोष्टी गुगलवर सर्च केल्यास महागात पडू शकतं. गुगलवर चाइल्ड पॉर्नोग्राफीबद्दल सर्च केल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. भारतात याबद्दल कठोर कायदे तयार करण्यात आलेले आहेत. चाइल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास पॉस्को कायद्यांतर्गत तुरुंगाची हवा खाऊ शकता.
या संदर्भात सर्च करताना पकडले गेल्यास 5 ते 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे बॉम्ब संदर्भात. जर एखाद्याने चुकूनही बॉम्ब कसा बनवायचा, हे गुगलवर सर्च केले तर सदरील व्यक्ती नक्कीच अडचणीत येऊ शकतो. चाइल्ड पॉर्नोग्राफी सारखंच यामध्ये देखील सर्च करताना पकडल्यानंतर तुरुंगवासाची शिक्षा आहे. फक्त तुरुंगच नाही तर सुरक्षा यंत्रणांसारख्या काही संवेदनशील गोष्टींमधील एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकतात.
अबॉर्शन ही देखील जगभरात लागलेली एक कीड आहे. जर समजा तुम्ही अबॉर्शन बद्दल काही माहिती गुगलवर सर्च केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. अबॉर्शनच्या बाबतीत भारत सरकारने काही कडक कायदे लागू केले आहेत.
अबॉर्शन, बॉम्ब बनवणे किंवा चाईल्ड पॉर्नोग्राफी या गोष्टी गुगलवर सर्च करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या गोष्टी सर्च करण्यापासून कोणीही लांब राहिलेलंच बरं राहील. अन्यथा तुरंगाची हवा खावी लागू शकते.