Saturday, July 27, 2024
Homenewsकिरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात

किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात


ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापूरला पुरावे गोळा करण्यासाठी निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानक परिसरात ताब्यात घेतले. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई करत किरीट सोमय्या यांना अटक केली.

मुंबईवरुन सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसने निघाले असता, त्यांना मुंबईपासून पोलिसांनी फाॅलोअप केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून सोमय्या यांनी कोल्हापूरला जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी त्यांना केल्यानंतर ते कराडला थांबण्यास तयार झाले.

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वाजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड रेल्वे स्थानक ओगलेवाडी येथे उतरले. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -