Wednesday, September 27, 2023
Homenewsदादागिरीचे उत्तर दादागिरीनेच दिलं जाईल ; सोमय्यांच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांचा इशारा

दादागिरीचे उत्तर दादागिरीनेच दिलं जाईल ; सोमय्यांच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांचा इशारा

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सोमय्यांच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

‘भाजपनेते किरिट सोमय्या यांना कोल्हापूरात येऊ देणार नाही अशा धमक्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. हे राज्य गुंडांची टोळी घेऊन चालवत आहात का? राज्य सरकारचे या गुंडांना समर्थन आहे का? राज्यात एवढी तालिबानी वृत्ती आली कुठून?’ असा खोचक सवाल सदाभाऊ खोत य़ांनी केला आहे.

‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. सोमय्या महालक्ष्मीच्या दर्शनाला निघाले आहेत. मी महाविकास आघाडीच्या लोकांना इशारा देऊ इच्छितो की, तुम्ही जर किरिट सोमय्यांच्या केसालाही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर, त्याच क्षणाला महाराष्ट्र सरकार बरखास्त झालेलं असेल. तुम्ही दादागिरी करीत असाल तर, निश्चितपणे दादागिरीचे उत्तर दादागिरीतूनच दिले जाईल’. असा इशारा खोत यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र